औरंगजेबाचा पुनर्जन्म (छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरुषार्थापुढे)

औरंगजेबाचा पुनर्जन्म

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरुषार्थापुढे गलितगात्र झालेला औरंगजेब १७०७ मध्ये अल्लाला प्यारा झाला.
अल्लापुढे आपल्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडताना तो प्रचंड बेचैन झाला होता आणि हुंदके देऊन वारंवार रडू लागला.  अल्लाने त्याला त्याच्या बेचैनीचे कारण विचारले.
शिवाजीराजांमुळे हिंदूंचा संपूर्ण निःपात करता न आल्याचे आत्यंतिक दुःख औरंगजेबाला झाले होते.
अल्लाला औरंगजेबाच्या खुनशी स्वभावाची आणि त्याने केलेल्या पापांची प्रचंड चीड आली होती पण औरंगजेबाचे स्फुंदून स्फुंदन रडणे पाहून अखेल अल्लाला त्याची दया आली आणि त्याने त्याला धीर देत शांत केले.
'बोल तुझी काय इच्छा आहे आता?' अल्ला.
' मला पुन्हा शिवाजीराजांच्या राज्यात जन्म घ्यायचा आहे आणि हिंदूंना पूर्णपणे नामशेष करायचे आहे' डोळे पुसत औरंगजेब म्हणाला.
मानवतेला हरताळ फासण्याची ही इच्छा ऐकून अल्ला आणखीनच संतापला आणि त्याने संतापाने औरंगजेबाला सैतानाचा स्वाधीन केले. सैतानाने औरंगजेबाची इच्छा ऐकली आणि अतिशय खूश होत त्याला समजावले, 
'हिंदूंना संपवायची तुझी महत्त्वाकांक्षा मला खूपच आवडली आहे. तुझे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि तुला याकामी शुभेच्छाही देतो पण आता तिथला समाज शिवाजीमहाराजांच्या पुरुषार्थामुळे जागृत झालेला असल्याने तुला हे काम करणे खूप अवघड जाणार आहे. तिथल्या संशोधक वृत्तीच्या लेखकांनी अपार मेहनत घेऊन, गड किल्ल्यांचे दौऱ्यावर दौरे करून आणि मराठ्यांच्या शौर्याचा अभ्यास करून मोठमोठाले ग्रंथ लिहून, मोठेमोठे नाट्यप्रयोग करून समाजात प्रचंड प्रमाणात जनजागृती केली आहे. त्यामुळे समाजात तुझ्याविषयीचा असंतोष शिगेला पोहोचला आहे. आता तू परत औरंगजेबाच्याच रूपात गेलास तर तुला तुझे हे काम करता येणे अशक्य आहे' सैतान. 
सैतानाचे बोलणे ऐकून औरंगजेब आणखीनच दुःखी झाला आणि त्याच्यापुढे लोळण घेत गयावया करायला लागलेला पाहून सैतानाचे मन द्रवले आणि त्याने त्याला उपाय सांगितला. 
' हे बघ. आता हिंदूंना नामशेष करायचे असेल तर तुला हिंदू बनूनच ते करावे लागेल. त्यासाठी त्याच राज्यात एखाद्या सामान्य घरात जन्म घ्यावा लागेल आणि शेतीतल्या बारकाव्यांचा अभ्यास करताकरता  राजकारणातले कावे आणि बारकावेही अंगात भिनवायला लागतील. एखाद्या महान नेत्याचा शिष्य बनण्याचे नाटक करावे लागेल. शिवाजी महाराजांचे गुणगाण गाण्याचे नाटक करत, बाहेरच्या देशांशी संगनमत करत आणि तिथून पैसा उभा करून, जवळच्या लाळघोटेपणा करणाऱ्यांना तो पैसा पुरवून, त्यांना कह्यात घेऊन, राजकीय शत्रुच्या पाठीत वारंवार खंजीर खुपसण्याची 'जाणकार' कला आत्मसात करावी लागेल' 
' पुढे? ' 
'आयुष्यभर देशसेवेचे व्रत घेऊन, स्वतःची आयुष्ये मातृभूमीसाठी ओवाळून टाकणाऱ्या, राबराब राबून संशोधन करून छत्रपतींचा खरा इतिहास लिहिणाऱ्यांविरुद्ध षडयंत्र आणि कारस्थाने रचून तुला त्या लेखकांनाच बदनाम करावे लागेल आणि छत्रपतींचे हिंदुंपेक्षाही यवनांवरच जास्त प्रेम आणि विश्वास होता असे खोटेच संशोधन जनतेपुढे मांडून जनतेचा बुद्धीभेद करावा लागेल. शिवाजीमहाराजांचा तुला त्रास झाला म्हणून समर्थ रामदास स्वामी आणि इतरही संतांची तुला हेतुपुरस्सर बदनामी करावी लागेल'.
' ठीक आहे. पुढे? '
' एकदा का हे पार पाडले की नाना युक्त्या, कट, कारस्थाने, फसवेगिरी करून सत्ता हस्तगत करावी लागेल. बेगडी हिंदुसंघटनांना लॉलीपॉप दाखवून त्यांच्याकडूनही यवनउदात्तीकरणाचे काम पुढे रेटावे लागेल.'
' अवश्य! पण माझी अजून एक खंत आहे '
' कोणती? '
'यवनांची सत्ता विस्तारण्यासाठी जीवापाड मेहनत घेऊनही शेवटी मला केवळ एका थडग्याएवढीच अल्प जागा मिळाली आहे! '
' काळजी करू नकोस. तू तुझ्या अक्कलहुशारीने गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या हजारो एकर जागांच्या सातबारांवर स्वतःचे व तुझ्या हुजऱ्यांची नावे लावशील आणि सातबारानरेश म्हणून विख्यात होशील '
' खूप खूप आभार सैतानजी! आपण केलेल्या अमूल्य मार्गदर्शनाबद्दल मी आपला जन्मोजन्मी ऋणी राहीन '
' पण... ' सैतान. 
' आता हे पण काय? '
' तू केलेल्या अमानुष हत्यांबद्दल तुला अल्लाने दिलेली शिक्षाही भोगावीच लागेल'.
' कोणती शिक्षा? '
' शिवाजी महाराज आणि हिंदूंना सतत दूषणे दिल्याने आणि महात्मा शंभूराजेंची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यामुळे तुझ्या उत्तरआयुष्यात तुझे तोंड दाखवण्यालायक राहणार नाही.  साखरेचे कारखानेच्या कारखाने फस्त केले असलेतरी तुझे तोंड साखरेचा कणही खाण्याच्या लायकीचे राहणार नाही.  तुझ्या बरोबर सत्तेत असणारे तुझे जवळचेच नातेवाईक अखेरला तुझ्याच पाठीत खंजीर खुपसतील'
' अरेरे!.. च् च् च् च् च्.... पण काही हरकत नाही. माझे कामतर अखेरीला तडीस जाईल ना?' औरंगजेब. 
तेवढ्यात फोन खणाणतो. सैनात फोन घेतो. फोनवर बोलताबोलता सैतानाच्या चेहऱ्यावर निराशेचे ढग जमा व्हायला लागतात. 
' अरे औरंगजेबा, तुझे काम तडीस जावे अशी माझीही तीव्र इच्छा आहे आणि माझे आशीर्वादही आहेत पण.. '
' आता हे दुसरे पण काय? ' अस्वस्थ होत औरंगजेबाने विचारले. 
' अरे पोरा! आत्ताच फोनवर बातमी समजलीय..' 
' कोणती?' 
'गुजरातमध्ये जन्म घेऊन पुढे संपूर्ण देशावर राज्य करून राष्ट्रद्रोह्यांना आणि भ्रष्टाचारी लोकांना नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजही परत जन्म घेणार आहेत ही ती बातमी! '

Comments